Tue, Mar 26, 2019 20:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमटीडीसीच्या रिसॉर्टचा रावलांकडून बेकायदेशीर ताबा

एमटीडीसीच्या रिसॉर्टचा रावलांकडून बेकायदेशीर ताबा

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:45AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने एमटीडीसीच्या तोरणमाळ येथील रिसॉर्टचा बेकायदेशीर ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे, नोटबंदीच्या काळात केंद्र सरकारने काळ्या यादीत टाकलेली ही कंपनी अद्यापही सुरुच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. सध्या जमीन खरेदी प्रकरणीही रावल संशयाच्या भोवर्‍यात असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले,  तोरणमाळ हिल रिसॉर्टने 1991 मध्ये एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल भाड्याने घेतले होते. 1996 मध्ये पाच वर्षांसाठीचा करार संपुष्टात आल्यानंतर कंपनीने पुन्हा 2001 ते 2006 साठी करार केला. परंतु त्याचे भाडे भरले नाही. उलट या कंपनीनेच आपण विविध कामांसाठी खर्च केलेले 60 लाख रुपये एमटीडीसीने द्यावे, अशी मागणी केली.  एमटीडीसीने 2011 मध्ये सक्षम अधिकार्‍यांमार्फत नोटीस पाठवली असता अधिकार्‍यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आला.