Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीडीआर प्रकरण: उदिता गोस्वामीची दोन तास चौकशी

सीडीआर प्रकरण: उदिता गोस्वामीची दोन तास चौकशी (Video)

Published On: Apr 25 2018 4:12PM | Last Updated: Apr 25 2018 4:20PMठाणे : दिलीप शिंदे 

बेकायदेशीर सीडीआरप्रकरणी आतापर्यंत 9 खासगी गुप्तहेरांसह 13 आरोपींना अटक झाल्यानंतर बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्र्यांची चौकशी सुरू झाली आहे. 'पाप', 'जहर'सारख्या 14 चित्रपटांमध्ये भूमिका केलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी आणि तिचा पती दिग्दर्शक मोहित सूरी या दोघांची बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल दोन तास चौकशी केली. या अभिनेत्रीने वकील रिजवान सिद्धीकी यांच्याकडून तिच्या पतीचे सीडीआर काढले होते.

बेकायदेशीर सीडीआरप्रकरणी देशातील पहिली खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण बॉलिवूडपर्यंत पोहचले. आतापर्यंत रजनी पंडित यांच्यासह 9 खासगी गुप्तहेर, सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुझ्झीन सिद्धीकी यांचे वकील रिजवान सिद्धिकी, एक मोबाईल कंपनीचा कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी आणि सायबर तज्ज्ञांना अटक करण्यात आलेली आहे. 

सीडीआरप्रकरणी काही मॉडेल्ससह अभिनेते जॉकी श्रॉफ याची पत्नी आयशा श्रॉफ यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. ठाणे पोलिसांनी सुमारे 284 सीडीआरबाबतचा तपास केल्यानंतर अनेक महत्वाच्या नावांचा खुलासा झालेला आहे. जिग्गनेश छेडा याच्या अटकेनंतर बुधवारी अभिनेत्री उदिता गोस्वामी हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागात बोलावण्यात आले होते. त्यावेळी उदिताची दोन तास कसूर तपासणी करण्यात आली. वकील रिजवान यांच्याकडून पतीचे सीडीआर घेतल्याप्रकरणी गोस्वामीचा जबाबही नोंदविण्यात आला असून तिने पोलिसांना तपासात मदत केल्याचे  ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.  तसेच उदिताचा पती दिग्दर्शक मोहित सूरी याची ही कसून चौकशी करण्यात आली. 

Tags : Illegal CDR case, Thane Police, Udita Goswami