होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पासाठी बेकायदा मंडप दिसला तर अधिकारी जबाबदार

बेकायदा मंडप दिसला तर अधिकारी जबाबदार

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:50AMमुंबई : प्रतिनिधी 

अगामी सण- उत्सवांच्या काळात ध्वनि प्रदूषण आणि बेकायदेशीर मंडपा ंबाबतच्या नियमावलीचे  तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करा.  अगामी गणेशोत्सवात  मुंबई,नवी मुंबई, ठाणे, पुणे शहरात एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका,  असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तर आदेशाचे पालन झाले नाही तर जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकार्‍यांनी  अवमान कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा अशी तंबीच न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने  दिली.

विविध उत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या ध्वनिप्रदूषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍चभूमीवर ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते  डॉ. महेश बेडेकर यांनी  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला सायलन्स झोनची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याानुसार मुंबई आणि उपनगरात 110 शांतता क्षेत्र निश्‍चित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली.याची दखल न्यायालयाने घेतली ध्वनिप्रदूषणाबरोबरच आगामी गणेशोत्सवात स्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता केवळ एक तृतीयांश जागेतच, सर्व बाबींची पूर्तता करून मंडप बांधण्याची मंडळांना परवानगी द्या . रस्त्यावर बेकायदा मंडप उभारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.त्याचबरोबर सायलेंस झोनच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करत लाऊड स्पीकर्सचा वापर आणि ध्वनिप्रदूषणासाठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करा.नियमांचे उल्लघंन करणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.