Thu, Nov 15, 2018 04:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर देशभरातील डॉक्टर संपावर जातील 

...तर देशभरातील डॉक्टर संपावर जातील 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन बिल (NMC) लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात देशभरातील सर्व डॉक्टर संपावर जातील, असा इशारा इंडियन मेडिकल संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी दिला आहे. डोंबिवलीमध्ये सोमवारी आयोजित आयएमएच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकार आणू पाहणारे नॅशनल मेडिकल बिल डॉक्टरांच्या विरोधात आहे, म्हणून आमचा त्याला विरोध नाही. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न निश्चीतपणे केवळ स्वप्नच राहील अशा तरतुदी या कायद्यामध्ये असल्याचे डॉ. पाटे म्हणाले. तर ज्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी दुरान्वयेही संबंध नाही किंवा ज्यांना या क्षेत्राचा गंधही नाही अशा लोकांकडून हे बिल आणण्यात आले आहे. 

आज वैद्यकीय क्षेत्रावर दुर्लक्षितपणाचा ठपका ठेवला जातो. मात्र हे बिल मंजूर झाल्यानंतर जो हाहाकार उडेल त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवालही त्यांनी केला. आज डॉक्टरांवर सर्रासपणे हल्ले केले जातात, रुग्णालयांची मोडतोड केली जाते यासाठी राज्यस्तरीय कायदा असला तरी जोपर्यंत केंद्रीय कायदा बनत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही. या केंद्रीय कायद्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून भांडत आहोत. परंतु केंद्र शासनाने मागण्या मान्य करूनही त्या प्रत्यक्षात आणलेल्या नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे उद्या दिल्लीत आयएमएची महत्वपूर्ण बैठक होत असून केंद्राने हे बिल लादण्याचा प्रयत्न केला तर बुधवारपासून देशभरातील प्रत्येक डॉक्टर संपावर जाईल असा इशारा डॉ. मंगेश पाटे यांनी यावेळी बोलताना दिला.
 

Tags : doctors, country, strike, NMC, Mumbai news 


  •