Fri, May 29, 2020 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता' 

'तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता' 

Published On: Sep 18 2019 8:56AM | Last Updated: Sep 18 2019 8:55AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची स्तुती देखील केली आहे. त्यांच्या काळात सावरकर जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानच जन्माला आला नसता, असे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे.

'सावरकर : इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. आता पुन्हा त्यांनी या मागणीवर जोर दिला आहे.

सावरकर यांनी १४ वर्ष तुरुंगवास भोगला. त्यांनी मरणयातना देखील भोगल्या, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. त्यांना या पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.