Wed, Jul 17, 2019 08:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल दुर्घटना : मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर...

कमला मिल दुर्घटना : मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर...

Published On: Dec 29 2017 6:39PM | Last Updated: Dec 29 2017 6:39PM

बुकमार्क करा
मुंबइई : प्रतिनिधी

कमला मिल्स कंपाऊंडमधल्या अग्‍नितांडवात मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येतो आहे. या बिल्डिंगमध्ये आगीचे नियम पाळले जात नाहीत, त्यावर कारवाई करावी, अशी तक्रार मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र, मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले.

कशाळकर यांनी 10 ऑक्टोबर 2017 रोजी कमला मिल्स कंपाऊंडसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली. काहीच उत्तर मिळत नाही कळल्यावर दोनवेळा पाठपुरावा केला. पोस्टाने उत्तर पाठवल्याचे सांगत तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर कशाळकरांना बीएमसीकडून उत्तर मिळाले की, कमला मिल्स कंपाऊंडमध्ये कोणत्याच प्रकारच्या अवैध गोष्टी नाहीत.

कमला मिल्स कंपाऊंडमध्ये रुफ टॉपवर बांधकाम करण्यात आले होते, ज्याला परवानगी नाही. शिवाय आगीसंदर्भातील जे 35 नियम असतात, तेही पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. त्यानंतरच तक्रार केली होती, असे कशाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Image may contain: 1 person