Wed, Jan 22, 2020 22:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर राहुल यांची संपूर्ण 'सोय' मी स्वतः करतो : संजय राऊत 

तर राहुल यांची संपूर्ण 'सोय' मी स्वतः करतो : संजय राऊत 

Published On: Aug 25 2019 6:00PM | Last Updated: Aug 25 2019 6:00PM

खासदार संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये येण्याचे आव्हान दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले. त्यानंतर राहुल यांनी ते आव्हान स्वीकारताना काल (ता.२५) विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांसह दौरा केला. मात्र, त्यांना श्रीनगर विमानतळावरून त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव अडवण्यात आले. 

विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला विमानतळावरून दिल्लीला रवानगी करण्यात आली. आता याच मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. राहुल यांना काश्मीरमध्ये पर्यटन आणि मौजमजा करण्यासासठी जाण्याची ईच्छा असेल, तर त्यांची सोय मी करतो असे टोमणा मारला आहे. नेत्यांनी काश्मीर दौरा करण्यापेक्षा खोऱ्यातील शांतता महत्त्वाची असल्याचे राऊत यांनी नमूद केले. 

संजय राऊत म्हणाले पुढे म्हणाले, परिस्थिती बिघडेल असे वर्तन नेत्यांनी करू नये. कलम 370 हटवल्यानंतर 20 दिवसांनी काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाला विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले. काँग्रेसकडून राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेमन, भारतीय साम्यवादी पक्षाचे डी. राजा तसेच शरद यादव यांच्यासह दिग्गज नेते श्रीनगरमध्ये गेले होते. 

दुसरीकडे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यावरून काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. केंद्र सरकारची ही कृती राष्ट्रविरोधी असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यासह जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना श्रीनगर विमान तळावरूनच माघारी धाडल्यानंतर प्रियांका यांनी टीकास्त्र सोडले.