Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ईव्हीएम हटवले तर भाजप पडेल - राज ठाकरे 

ईव्हीएम हटवले तर भाजप पडेल - राज ठाकरे 

Published On: Aug 28 2018 3:35PM | Last Updated: Aug 28 2018 3:34PMमुंबई : प्रतिनिधी

निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणा-या वोटिंग मशिन्समध्ये हेराफेरी केली जाते. असा आरोप सर्वपक्षीय नेत्यांकडून केला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएम हटवले तर भाजप नक्की पडेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स वापरल्या जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जात असल्याचा आरोप निवडणुकांच्या तोंडावर सर्वपक्षीय नेत्यांकडून वारंवार केला जातो. याच अनुषंगाने लोकांचे दोस्त या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भाजप विरुद्ध भारतीय अशी मोहिम हाती घेतली आहे. ‘ईव्हीएम हटाव, बीजेपी भगाव’ हे ब्रीद वाक्य घेऊन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. ईव्हीएम विरोधात सर्व राजकीय नेत्यांनी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन लोकांचे दोस्त या संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाने यांनी स्पष्ट केले.

याच प्रमुख मागणीसाठी या संस्थेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसे देखील पूर्ण ताकतीने या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे. तसेच दिल्लीत निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. येत्या काळात ईव्हीएम मशीन हटवले तर भविष्यात भाजप पडणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.