Wed, Nov 21, 2018 07:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अतिरिक्त दुधापासून आईस्क्रीम व चॉकलेट

अतिरिक्त दुधापासून आईस्क्रीम व चॉकलेट

Published On: Dec 02 2017 5:52AM | Last Updated: Dec 02 2017 1:51AM

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे 

अतिरिक्त दुधाच्या निर्माण झालेल्या प्रश्‍नातुन मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार आता गुजरात व कर्नाटकचा पॅटर्न राबविण्याच्या विचारात आहे.  या राज्यांनी अतिरिक्त दुधाच्या समस्येवर मात करण्यासाठी दिर्घकाळ टिकणारी उत्पादने तयार केली आहेत.त्याचा अभ्यास केला जाणार असुन  त्यामध्ये  आईस्क्रीम व चॉकलेटचा  समावेश आहे.

राज्यात सुमारे 15 ते 16 लाख लिटर दुध हे अतिरिक्त झाले आहे. सध्या दुधाचा पुष्ट काळ सुरू असुन याकाळात येणारे जादा दुध हे पावडरसाठी वापरले जाते. पावडरला जागतिक बाजारात चांगली मागणी  होती तोवर सगळे व्यवस्थीत सुरू होते.  जागतिक मागणीत घट होताच दुध उद्योगाचा सारा डोलाराच कोसळण्याची वेळ आली. 

 अतिरिक्त दुधाच्या समस्येने दुध संघांचे चालक हबकले व त्यांनी सरकारकडे धाव घेतली. त्यावर तातडीचा उपाय म्हणजे नेहमीप्रमाणे समिती नेमण्यात आली. समिती अहवाल देणार मग त्यावर निर्णय होणार अशी सध्याची स्थिती आहे. 

महाराष्ट्रात अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न हा केवळ पावडर तयार करूनच सोडविला जातो. मात्र शेजारच्या गुजरात व कर्नाटकने मात्र अतिरिक्त दुधाला सरकारी अनुदान देतानाच चांगल्या पर्यायाचाही अवलंब केला आहे. त्यातुनच कायम मागणी असणार्‍या आईस्क्रीम व चॉकलेट उत्पादनांवर त्यांनी  लक्ष केंद्रीत केले. त्याचेच अनुकरण करण्याचा महाराष्ट्राचा विचार आहे.