Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंडे भाऊ-बहीण एकत्र आले तर मोठी पूजा घालू: चंद्रकांत पाटील

मुंडे भाऊ-बहीण एकत्र आले तर मोठी पूजा घालू: चंद्रकांत पाटील

Published On: Mar 07 2018 11:03AM | Last Updated: Mar 07 2018 10:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे एकत्र आले, तर आपण परमेश्व+राला सर्वात मोठी पूजा घालू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगताच मंगळवारी विधान परिषदेत हशा पिकला.

धनंजय मुंडे यांनी राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत बोलताना कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांाची यादी पटलावर ठेवण्याची मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देताना पाटील यांनी, कर्जमाफी झालेल्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे  मेळावे घेऊन त्या मेळाव्यांना आपण आणि धनंजय मुंडे सोबत जाऊ. इतकेच नाही, तर  मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्येही मेळावा घेऊ, अशी तयारी पाटील यांनी दर्शविली.

त्यावर आमदार सतीश चव्हाण यांनी, बीडमध्ये मेळाव्याला दोघेच जाणार का, पंकजा मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यांना बोलावणार नाही का, अशी कोटी केली असता, चंद्रकांत पाटील यांनी हे दोघे एकत्र आल्यास आपण देवाला सर्वात मोठी पूजा घालू, असे उत्तर दिले.