Mon, Jan 21, 2019 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री-शिवसेनेच्या शाळेत आदित्य ठाकरेंची एन्ट्री; पेट्रोल दरवाढीवरून मुख्यमंत्र्याना टोला

मुख्यमंत्री-शिवसेनेच्या शाळेत आदित्य ठाकरेंची एन्ट्री; पेट्रोल दरवाढीवरून मुख्यमंत्र्याना टोला

Published On: May 28 2018 1:53PM | Last Updated: May 28 2018 1:53PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

पालघर लोकसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेले साम-दाम-दंड-भेदाच्या शाळेत आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही प्रवेश घेतला आहे. आदित्य यांनी राज्यभर वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतींवरून नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘पेट्रोलचे दर कमी कमी करण्यासाठी साम,दाम,दंड, भेद वापरा असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

संपूर्ण राज्याप्रमाणे मुंबईतही इंधनांचे दर जास्त आहेत.निवडणुकांमध्ये साम,दाम,दंड आणि भेदाचा वापर करण्यापेक्षा सरकारने पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी त्याचा योग्य वापर करावा, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या शाळेत शिकायला उद्धव ठाकरे उत्सुक

शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारसभेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त टेप ऐकवली होती. त्यावर शिवसेनेने यात छेडछाड केल्याचा दावा करत संपूर्ण क्‍लिप ऐकविली असती तर ती ऐकविणारे तोंडावर पडले असते असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर काल, कूटनिती तसेच साम, दाम, दंड व भेदाचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. 

मुख्यमंत्र्यांनी कालच हे आव्हान स्वीकारत ‘ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांना मी रोज समजवायला तयार आहे.हवा असेल तर साम दाम दंड भेदचा अर्थ शिकवतो, असेही म्हणाले होते.