Wed, Sep 19, 2018 14:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला - अशोक चव्हाण

न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला - अशोक चव्हाण

Published On: Dec 22 2017 2:41PM | Last Updated: Dec 22 2017 2:41PM

बुकमार्क करा


मुंबई : प्रतिनिधी

सीबीआयकडे कोणतेही नवीन पुरावे नसताना राज्यपालांना हाताशी धरून मला या खटल्यात गोवण्याचं काम करण्यात येत होतं. राजकीय विरोधकांना संपविण्याचा डाव सत्ताधारी पक्षाने घातला होता. पण, न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय घेतला. यामुळे मी पूर्ण समाधानी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आदर्श प्रकरणासंदर्भात यापूर्वीच आपल्या विरोधात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा खटला भरण्यास परवानगी मिळाली असती, तर हा चुकीचा पायंडा पडला असता. न्यालायल्याने वस्तुस्थिती समजून घेत दिलेला निर्णय खरोखरच समाधानकारक असल्याचे चव्हाण म्हणाले. टू जी स्पेक्ट्रम संदर्भातील निर्णय असो की आज आलेला निर्णय आणि एकंदर काँग्रेसबाबत असलेलं देशातील वातावरण जनतेसाठी अच्छे दिनच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.