Wed, Nov 14, 2018 04:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नी आणि मेव्हण्याकडून पतीची निर्दयी हत्या 

'त्या' निर्दयी हत्येचा अखेर उलघडा 

Published On: Feb 07 2018 11:36AM | Last Updated: Feb 07 2018 11:41AMकल्याणः वार्ताहर 

गेल्या आठवड्यात टिटवाळा- मांडा परिसरात गळयापासून मुंडके व कमरेपासून खालचा भाग कापून गोणीत बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. या हत्येचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ठाणे ग्रामीण क्राईम शाखेने या हत्येचा अखेर छडा लावला.

सदरची हत्या कौटुंबिक वादातून झाली असून पत्नीने तिच्या भावाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मयताचे नाव रवींद्र शिवगण असून मेव्हणा गौतम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाच दिवसांपूर्वी पत्नी सुषमा व मेव्हणा गौतम मोहिते याने रविंद्रची निर्दयी हत्या करून त्याचे गळयापासून मुंडके व कंबरेपासून खालचा भाग कापून गोणीत बांधून टिटवाळा-मांडा परिसरातील सलमान चाळीच्या मागे काळू नदीच्या किनारी फेकून दिला होता. 

या हत्येचा तपास ठाणे ग्रामीण क्राईम पोलीस व टिटवाळा पोलिसांनी केला. सदरची हत्या वारंवार पती-पत्नी मध्ये होणाऱ्या भांडणातून झाल्याचे सांगण्यात आले आहे. मयताची पत्नी सुषमा ही फरार असून तिचा पोलिस शोध घेत आहेत.