Sun, Jun 16, 2019 08:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू

चर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू

Published On: Jun 12 2019 4:24PM | Last Updated: Jun 12 2019 4:24PM
मुंबई : प्रतिनिधी 

चर्चगेट स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून मधुकर नार्वेकर ( वय ६२) या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित होर्डिंग हे पश्चिम रेल्वेअंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, चर्चगेट स्‍टेशन परिसरात जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले. यावेळी तेथुन निघालेले मधुकर नार्वेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जी. टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, होर्डिंग कोसळण्यामागील नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.