Thu, Jul 09, 2020 07:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांचा लोकलने प्रवास

शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांचा लोकलने प्रवास

Last Updated: Nov 17 2019 5:44PM
ठाणे : प्रतिनिधी 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना सोबत घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील एक नंबर प्लॅटफॉर्म येथुन लोकल पकडून प्रवास केला. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, ठामपा सभागृह नेते आगामी महापौर पदाचे दावेदार नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. 

ठाणे रेल्वे स्थानक येथून प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथून सीएसएमटीला जाणारी चार वाजताची लोकल पकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी प्रवाशांशी चर्चा करत लोकल डब्यातून दादर पर्यंत प्रवास केला. यावेळी त्यांच्या सोबत शेकडो शिवसैनिक होते. बाळासाहेबांना मानवंदना देण्याकरिता दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवसैनिका सोबत लोकलने प्रवास करत जात असल्याचे शिंदेंनी सांगितले.