Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई: मानखुर्द येथील प्लास्टिकच्या गोदामाला आग

मुंबई: मानखुर्द येथील प्लास्टिकच्या गोदामाला आग

Published On: Feb 11 2018 12:41PM | Last Updated: Feb 11 2018 12:41PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील आगीचे सत्र संपण्याचे नाव दिसत नाही. मानखुर्द- घाटकोपर महामार्गावर असलेल्या मंडाला येथील गोदामा ला रविवारी सकाळी आग लागली. सूत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार,  सकाळी 6 च्या दरम्यान ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. गोदामात प्लास्टिक ड्रम, पॅकींग मटेरियल, तेलाचा साठा यामुळे आग अधिक वाढली. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून सुदैवाने यात जीवीतहानीचे वृत्त नाही.