Wed, Apr 24, 2019 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पाच्या मार्गात किती खड्डे?

बाप्पाच्या मार्गात किती खड्डे?

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमन मिरवणूक मार्गावर जिथे जिथे खड्डे असतील, अशा खड्डयांचे फोटो, रस्त्याचे नाव व विभागाचे नाव मुंबई गणेशोत्सव समितीकडे पाठविण्याचे आवाहन मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असली, तरी मुंबईतील अनेक गणपती मंडळे गणेश चतुर्थीपूर्वीच बाप्पाची मूर्ती मंडपात आणत असतात. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पावसाने खड्डे पडत असल्याने मूर्ती आणताना मूर्तीला नुकसान होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि बृह्न्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या  बैठकीत मुंबईच्या रस्त्यांचा प्रश्‍न उपस्थित झाला. 

रस्त्यावरील खड्डयांची सविस्तर माहिती मिळाल्यास खड्डे बुजविणे पालिकेला सोपे जाणार आहे. म्हणूनच सर्व गणेश मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावरील खड्डयांचे फोटो, रस्त्याचे नाव, मंडळाचे नाव, विभागाचे नाव अशाप्रकारचा संपूर्ण तपशील समन्वय समितीकडे 25 जुलैपर्यंत पाठवावे, जेणेकरुन पालिकेला त्या रस्त्यांची दुरुस्ती लवकर करता येईल, असे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.