Tue, Jul 16, 2019 09:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेक्षकांची ‘करणी’...‘पद्मावत’ हाऊसफुल्‍ल

प्रेक्षकांची ‘करणी’...‘पद्मावत’ हाऊसफुल्‍ल

Published On: Jan 26 2018 1:43AM | Last Updated: Jan 26 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी 

करणी सेनेच्या तीव्र विरोधामुळे राज्यभरात गुरुवारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विविध थिएटर, मल्टिप्लेक्सेसबाहेर मोठा बंदोबस्त तैनात तरण्यात आला होता. मात्र या गोंधळातही प्रेक्षकांनी आपली करणी दाखवत पद्मावत पहिल्याच दिवशी हाऊसफुल्‍ल केला. या चित्रपटाला होत असलेल्या विरोधाला बाजूला सारत व महागडी तिकिटे असतानाही प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने हा चित्रपट राज्यभरात हाऊसफुल्ल झाला आहे. मुंबईत काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची तिकिटे तब्बल 700 ते 1500 रुपयांवर गेल्यानंतरही हा चित्रपट गर्दी खेचत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

महागडी तिकिटे 

मुंबईत अट्रीया मॉल येथे याचे दर 1050 ते 1550 दरम्यान गेले होते. तर, कुर्ला येथील फिनिक्स मार्केट सिटी येथे 780 रूपये, गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल येथे 730 रूपये, वाशी येथील रघुलीला मॉल येथे 800 रूपये, वर्सोवा येथील पीवीआर येथे 1530 रूपये व पीवीआर फिनिक्स येथे 900 रूपयांवर तिकिटाचे दर गेले आहेत. मात्र तिकिटाचे दर वाढल्याचा कोणताही परिणाम चित्रपटाच्या प्रेक्षकांवर झालेला नसून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करीत आहेत.