Tue, Jun 25, 2019 13:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ताशी ‘८० किमी’ची सक्‍ती

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ताशी ‘८० किमी’ची सक्‍ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगाची किमान मर्यादा निश्चित केली असून आता या मार्गावर ताशी 80 किमीपेक्षा कमी गतीने वाहन चालवता येणार नाही अशी अधिसूचना जारी केली आहे.

पहिल्या लेनमध्ये रेंगाळणार्‍या वाहनांमुळे मागून भरधाव येणार्‍या वाहनांची अडचण होत असल्यामुळे ही  किमान वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तशी अधिसूचनाच वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे. या अटीतून अत्यावश्यक सेवा वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, पोलीस आणि शासकीय वाहने यांना वगळण्यात येत आहे, असे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर.के. पद्मनाभन यांनी  स्पष्ट केले.

Tags : mumbai news, Mumbai-Pune expressway, Hourly, 80 km  force,


  •