Mon, May 27, 2019 01:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेहुणीच्या लग्नासाठी घरमालकाची हत्या

मेहुणीच्या लग्नासाठी घरमालकाची हत्या

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:46AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण मोहने येथील महादेव जाधव यांच्या मंगळवारी झालेल्या हत्येचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला असून, मेहुणीच्या लग्‍नाला पैसे गोळा करण्यासाठी जाधव यांच्या मुलाचा भाडेकरू अमरजीत सतीराम राजभर याने चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या केली आहे. अमरजीतच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अमरजीत हा मृत महादेव जाधव यांचा मुलगा हरिभाऊ जाधव यांच्या खोलीत राहतो. शुक्रवारी त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात येणारआहे. 

आंबिवली स्टेशन नजीक मोहने-यादवनगर येथे शेतात बांधलेल्या घरात मनोहर जाधव पत्नीसह राहत होते. त्यांची तीन मुले याच गावात राहतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास महादेव हे व्हरांड्यात झोपले होते. अज्ञातांनी महादेव जाधव यांचा अत्यंत निर्घृण खून केला होता. त्यांचे डोळे फोडण्यात आले. तर त्यांच्या डोके, तोंड, कान, गळ्यावर वार करण्यात आले. 

खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला लाकडी दांडका हस्तगत केला. सुरुवातीला शेतकर्‍याच्या हत्येमागे काही भूमाफिया असावेत, असा कयास बांधला जात होता. मात्र क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळ आणि त्यांच्या  पथकाने मोहने, यादवनगर परिसरात जाळे पसरले. खबर्‍याकडून ही माहिती उपलब्ध झाली. 

Tags : Mumbai, Homeowner, murder, Sister in law, marriage,  Mumbai news,