Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामुंबईत घरांच्या किमती १० टक्क्यांनी उतरल्या!

महामुंबईत घरांच्या किमती १० टक्क्यांनी उतरल्या!

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महामुंबईत 7 वर्षांत पहिल्यांदाच घरांच्या किमती 10 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मंदीच्या फेर्‍यात अडकलेले बांधकाम क्षेत्र मेटाकुटीस आले आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीमुळे घरांची खरेदी मंदावली. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी विकासकांनी हा निर्णय घेतला आहे. 

याबाबत नाईट फ्रँक इंडियाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये मुंबईतील बांधकाम क्षेत्राची स्थिती नमूद केली आहे. घरांच्या मूळ किमतीमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे तर इतर सवलती आणि योजनांमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यात येत आहे. मुद्रांक शुल्क विकासकांनी भरायचे, विविध भाडे तत्वावरील योजना यांची सध्या चलती आहे.  हे विचारात घेतले तर घरांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत.  

2010 मध्ये बांधकाम क्षेत्र प्रचंड तेजीत आले होते. 1 लाख 38 हजार 613 सदनिका विक्रीसाठी यावर्षात खुल्या करण्यात आल्या होत्या. हाच आकडा 2017 मध्ये केवळ 23 हजार 253 इतका भरला होता. 2010 मध्ये 1 लाख 8 हजार 680 सदनिकांची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी 62 हजार 256 सदनिका विकल्या गेल्या.