Sun, Mar 24, 2019 17:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियावरील अफवांमुळे राज्यातील शांतता बिघडली : केसरकर

सोशल मीडियावरील अफवांमुळे राज्यातील शांतता बिघडली : केसरकर

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ज्या वढू बुद्रूक येथील घटनेचा संदर्भ देऊन राज्यातील शांतता व सलोख्याचे वातावरण बिघडविण्यात आले. त्यास सोशल मिडियामधील अफवाच कारणीभूत असल्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे निर्माण होणारी परिस्थिती संयामाने हाताळण्याच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्यात होत्या. त्यामुळेच मुंबई व राज्यातील एकंदर परिस्थिती नियंत्रणात राहिल्याचे त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

वढू बुद्रूक या गावास आपण स्वत: भेट देऊन तेथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली.त्या गावात पूर्णपणे शांततेचे वातावरण होते. मात्र त्या ठीकाणी 50 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा चुकीचा संदेश समाज माध्यमांद्वारे पसरविण्यात आला. प्रत्यक्षात 9 जणांवर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.