सोशल मीडियावर '#HinduMuslimBhaiBhai' सर्वाधिक लक्षवेधी ट्रेंड!

Last Updated: Nov 09 2019 5:03PM
Responsive image
सर्वाधिक लक्षवेधी ट्रेंड


नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

सर्व देशाचे लक्ष लागलेल्‍या अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला. वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. या निर्णयाचे राजकीय मंडळीकडून देखील स्‍वागत केले जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्‍या या महत्‍त्‍वपूर्ण निर्णयानंतर काही क्षणातच माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाईट असलेल्‍या ट्विटरवर भारतातच नाही तर जगभरात  #HinduMuslimBhaiBhai (हिंदू-मुस्लिम भाई -भाई), #RamMandir (राम मंदिर),  #JaiShriRam (जय श्री राम) यासारखे हॅशटॅग ट्रेंडमध्‍ये आले. दुपारनंतर देखील सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयासंबंधीत हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडमध्‍ये होते. जगभरातील टॉप 10 ट्रेंडिंगपैकी पाच आणि भारतातील टॉप 10 ट्रेंड या निर्णयाशी संबंधित होते. यावरुन एक लक्षात येते की, अयोध्‍या निकालेकडे देशासह जगाचे देखील लक्ष लागले होते. 

#HinduMuslimBhaiBhai 

या सर्व ट्रेंडमध्‍ये सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो #HinduMuslimBhaiBhai (हिंदू-मुस्लिम भाई -भाई) हा ट्रेंड. १९९२ मध्ये अयोध्‍येतील वादग्रस्‍त जमिनीचा वाद टोकाला पोहोचला. त्‍यानंतर देशभरात उसळलेल्‍या दंगलीत जवळपास दोन हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्‍यामुळे गेल्‍या दोन दशकांपेक्षा जास्‍त काळ हा मुद्दा हिंदू -मुस्‍लीम यांच्‍यात दरी निर्माण करणारा ठरला. ही पार्श्वभूमी असतानाही भारतीय जनतेने #HinduMuslimBhaiBhai हा ट्रेंड टॉप टेनमध्‍ये आणून कसोटीच्‍या काळातही देशात सौहार्द राखता येते याचे उदाहरण घालून दिले. 

#AyodhyaVerdict टॉप ट्रेंडमध्‍ये

#AyodhyaVerdict (अयोध्या निकाल) भारत आणि जगभरात आज टॉप ट्रेंडमध्‍ये राहिला. यासंबंधीत 4,40,000 पेक्षा जास्‍त ट्‍वीट करण्‍यात आले.

भारतातील ट्रेंड

भारतात, #BabriMasjid (बाबरी मशिद),  Sunni Waqf Board (सुन्नी वक्फ बोर्ड) देखील ट्रेंडमध्‍ये होते. सुन्नी वक्फ बोर्ड संबंधित दिल्लीत जवळ जवळ 5,000 ट्वीट करण्‍यात आले. यासोबतच #RanjanGogoi (रंजन गोगोई) आणि #AyodhyaJudgement (अयोध्या निकाल) याचा देखील टॉप ट्रेंडमध्‍ये समावेश होता. तसेच #JaiShriRam (जय श्री राम) हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्‍ये होता. यासंबंधीत 40,000 पेक्षा जास्‍त तर  #RamMandir (राम मंदिर) संबंधित 1,20,000 पेक्षा जास्‍त ट्वीट करण्‍यात आले आहेत. #HinduMuslimBhaiBhai (हिंदू-मुस्लिम भाई भाई) संबंधीत 33,000 पेक्षा जास्‍त  ट्वीट करण्‍यात आले आहेत. यासोबतच देशात सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश रंजन गोगोई यांचे नाव देखील ट्रेंडींगमध्‍ये होते.

जगभरातील ट्रेंड

जगभरातील ट्रेंडमध्‍ये  #RamMandir (राम मंदिर) हा हॅशटॅग दुसर्‍या नंबरवर ट्रेंडमध्‍ये राहिला. याच हॅशटॅग संबंधीत 1,00,000 पेक्षा जास्‍त ट्वीट करण्‍यात आले. तिसर्‍या नंबरवर #AyodhyaJudgement (अयोध्या निकाल) हा हॅशटॅग राहिला. या हॅशटॅग संबंधीत  50,000 पेक्षा जास्‍त ट्वीट करण्‍यात आले. चौथ्‍या नंबरवर  #JaiShriRam हा हॅशटॅग होता.  यासंबंधी 40,000 पेक्षा जास्‍त ट्वीट करण्‍यात आले आहेत.

लातूर : उदगीरात एका कोरोना बधितांचा मृत्यू


बिग ब्रेकिंग न्यूज! : गलवान व्हॅलीतून चीन दोन किलोमीटर मागे सरकला


वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन


'हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अपयशाच्या अभ्यासात कोरोना, नोटबंदी आणि जीएसटी'


मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा 


रणवीरच्या 'या' गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील!


तर कुवेतमधील आठ लाख भारतीयांना नोकरी सोडून मायदेशी परतावे लागणार?


औरंगाबाद सात हजाराच्या उंबरठ्यावर


'तो' उद्योगपती 'ती' सरकारी नोकरदार, लग्नही गोडीत ठरलं असताना चर्चेत आला पीएम मोदींचा मुद्दा आणि...


देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ