Fri, Jan 18, 2019 12:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी शिक्षणाचा ओढा थांबवा!

विदेशी शिक्षणाचा ओढा थांबवा!

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

आपल्याकडील पदवीधरांचा ओढा हा परदेशातील उच्च शिक्षणाकडे अधिक आहे. ते थांबवण्यासाठी आपल्या देशांमध्ये शिक्षणात उपयुक्त तसे वातावरण तयार केले तरच तो ओढा थांबेल यासाठी आता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण कुमार यांनी व्यक्‍त केले. मुंबई विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ फोर्ट संकुलात थाटात झाला. या कार्यक्रमात स्नातकांना मार्गदर्शन करताना किरण कुमार बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, परीक्षा व मुल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद सदस्य, विविध विद्याशाखांचे समन्वयक उपस्थित होते.

किरण कुमार म्हणाले की, ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाबरोबच विविध माध्यमातून प्राप्त करता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानार्जन ही निरंतर अध्ययनाची प्रक्रिया असून ज्ञानप्राप्तीकडे असलेला दृष्टिकोन, जिज्ञासा, वाचनाची सवय, नाविण्याची कास यावरही ज्ञानप्राप्तीचे महत्व अधोरेखित होत आहे. जगात ज्या नविन गोष्टी घडतात त्याचा मूळ स्त्रोत निसर्गात आहे. 
निसर्गात या गोष्टी दडलेल्या आहेत.विविध संकल्पाचे भंडार निसर्गात आहे. जिओस्पेशिएल तंत्रज्ञानामुळे नविन माहितीचे स्त्रोत शोधून काढणे, आंतरजाळ, कम्युनिटी, समाज-सुसंवाद आणि समाज कल्याणासाठी वापर करता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरी भागातल्या सेवा आणि सुविधा अचूकपणे वेगाने आणि कमीतकमी खर्चात पुरविण्याची सवय झाली आहे. 

दीक्षांत समारंभात नेशनल एकेडमीक डिपोझीटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी आणि पदवीका आता डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती देण्यात आली.