Tue, Oct 24, 2017 16:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्या होत असतील, तर देश सुरक्षित आहे? : हायकोर्ट

हत्या होत असतील, तर देश सुरक्षित आहे? : हायकोर्ट

Published On: Oct 12 2017 8:27PM | Last Updated: Oct 12 2017 8:27PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्यानंतर गौरी लंकेश यांचीही एकाच पद्धतीने हत्या होत असेल, तर खरोखर देश सुरक्षित आहे काय? असे प्रश्‍न उपस्थित करून फरार आरोपींचा छडा लावण्यास अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. 

पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत़ या याचिकांवर गुरुवारी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने गौरी लंकेश यांच्या हत्येचीही दखल घेतली. हत्यांचा तपास सुरू असताना आणखी एका समाजवादी विचारवंताची हत्या होणे हे समाजाचे दुर्भाग्य आहे, असे मत न्यायालयाने व्यक्‍त केले. समाजात खुल्या विचारसरणीच्या प्रत्येक व्यक्‍तीला मोकळेपणाने वावरण्याचा अधिकार आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले. 

तपास यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालात फारशी प्रगती आढळून न आल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली. फरार आरोपींचा तपास लागू शकत नाही, हे तपास यंत्रणांचे अपयश आहे. संपूर्ण देश पिंजून काढायला हवा, असा सल्ला हायकोर्टाने दिला.