होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबाबाई मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

अंबाबाई मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीरात अखंड विणा नाम जप सप्ताह साजरा करण्यास सोनाई महिला उत्कर्ष मंडळाला परवानगी नाकारण्याचा देवस्थानच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मात्र परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हा देवस्थानचा आहे असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने सोनाई महिला उत्कर्ष मंडळाची याचिका निकाली काढली. यामुळे देवळाच्या गरूड मंडपात गेली 52 वर्षे सुरू असलेल्या अखंड विणा नाम जपाच्या परंपरेत खंड पडणार आहे. 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराच्या गरूड मंडपात सोनाई महिला उत्कर्ष मंडळामार्फत गेली 52 वर्षे रथसप्तमी पासून पुढे दहा दिवस अखंड विणा जप सप्ताह साजरा केला जात होता. त्यानुसार मंडळाने 24 जानेवारी ते 4 फेबु्रवारी या दहा दिवस सप्ताह साजरा करण्यासाठी देवस्थानकडे परवानगी अर्ज केला मात्र देवस्थाने 1 जानेवारी ते 31 जानेवारीला किरणोत्सात देवळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कारण देऊन परवानगी नाकारली होती.