Sat, Jul 20, 2019 21:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाईपलाईन झोपडपट्टीग्रस्तांना दोन भूखंड देण्याचे आदेश

पाईपलाईन झोपडपट्टीग्रस्तांना दोन भूखंड देण्याचे आदेश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी   

शहर आणि उपनगरांना पाणीपुरवाठा करणार्‍या तानसा मुख्य जलवाहिन्यांच्या जवळील झोपड्यांवर महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या रहिवाशांच्या  पुनर्वसनासाठी उपनगरांतील दोन भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले़   न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या रविाशांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र अनेक कुटूुंबीयांचे अद्याप पूनर्वसन करण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने या रहिवाशांसाठी मुळ कॅन्सर हॉस्पिटल आणि सार्वजनिक गृहनिर्माण प्रकल्पासाठी राखीव असलेले उपनगरांतील दोन भूखंड उपलब्ध करुन द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले.

उच्च न्यायालयाने शहर आणि उपनगरांना पाणीपुरवाठा करणार्‍या मुख्य जलवाहीन्यांच्या जवळ उभारलेल्या बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दुसर्‍या टप्पयातील या झोपड्या हटविण्यासाठी न्यायालयाने महापालीकेला 31 डिसेंबरची डेटलाईन दिली आहे. ही डेटलाईन जवळ आल्याने पालीकेन सरसकट सर्वच झोपड्यांना नोटीसा बजावून कारवाईला सुरूवात केल्यानंतर रहिवाश्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. 

त्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती  रियाज  छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने महानगरांसाठी विकास आराखड्याच्या (डीपी) सुधारित मसुद्याला अद्याप अंतिम स्वरुप दिले गेले नाही. तानसा जलवाहिनीच्या 10 मीटर्सच्या क्षेत्रातील हजारो झोपड्यांवर महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून कारवाई केल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. 

यावेळी न्यायालयाने या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सरकारने आधीच्या विकास आराखड्याला अनुसरून मरोळ आणि दिंडोशी येथील दोन भूखंडांबाबत विचार केला तर ते योग्य ठरेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने एकतर संबंधित दोन भूखंडांचे आरक्षण हटवावे किंवा या कुटुंबांसाठी तातडीने अन्यत्र जागा उपलब्ध करावी, असे निर्दश देऊन याचिकेची सुनावणी 20 एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली़

Tags : High court Order, give two plots, pipeline slum, affected people, mumbai news


  •