Mon, Sep 24, 2018 00:08



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत हायअ‍ॅलर्ट

मुंबईत हायअ‍ॅलर्ट

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:35AM

बुकमार्क करा




मुंबई : वृत्तसंस्था

‘अल-कायदा’च्या धमकीनंतर मुंबईत हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.नव्या वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘अल-कायदा’ने चित्रफीत प्रसारित करून दिल्ली, बंगळुरू, कोलकातासारख्या महानगरांत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. 

काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त असल्याने अन्य शहरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा इशारा ‘अल कायदा’ने दिला आहे. ‘अल कायदा’च्या चित्रफितीनंतर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर असून घातपाताचा कट उधळून लावण्यास पोलीस सज्ज असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियांवरील संशयास्पद संदेशावरही पोलिसांची नजर असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे, विमानतळासह गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात केल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. त्यामुळे तटरक्षक दलानेही सागरी भागातील बंदोबस्त वाढवला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.