होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नुकसान भरपाई वसूल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवायला हवी

नुकसान भरपाई वसूल करून हिंसक आंदोलकांना जरब बसवायला हवी

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

मोर्चा काढून हिसंक आंदोलन करत पोलिसांच्या गाड्या, न्यूज चॅनेलच्या गाड्या जाळण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणार्‍या आंदोलकांना जरब बसायला हवी. राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अशा व्यक्तींची जबाबदारी निश्‍चित करत त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करायला हवी. यातूनच अशा आयोजक व आंदोलकांच्या बाबतीत सरकार समाजामध्ये कठोर संदेश पोहोचवू शकेल, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. 

सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी 11 ऑगस्ट 2012 रोजी आझाद मैदानाबाहेर अत्यंत हिंसक आंदोलन झाले होते. बर्मामधील मुस्लिम बांधवांच्या हत्याकांडाचा निषेध नोंदवण्यासाठी कुर्ला येथील मदिनातुलम फाऊंडेशन या आयोजक संस्थेने शांततापूर्ण निदर्शने करण्याकरिता परवानगी मिळवली होती. मात्र, सभेत काहींनी प्रक्षोभक भाषणे केल्यानंतर एक मोठा जमाव हिंसक झाला होता. त्यात सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करतानाच पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवताना पोलिसांना लाठीमार, रबरी काडतुसाच्या फैरींसह हवेत गोळीबारही करावा लागला होता.

या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ए. शैला यांनी चौकशी करून आंदोलनात सहभागी झालेल्या रझा अकादमीचे मोहम्मद सईद शफी अहमद नूरी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. 

दोन कोटी 74 लाख 33 हजार रुपये सरकारकडे जमा करण्यासाठीही बजावलेल्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  

Tags : Mumbai, High Court ,  expressed,  opinion, Mumbai news,