Tue, Apr 23, 2019 06:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करा : उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करा : उच्च न्यायालयाचे आदेश

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर व उपनगरांत इमारत दुर्घटनांचे वाढलेले प्रमाण आणि प्रत्येक पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होत असतानाही मुंबईत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यास मुहूर्त शोधत आहात का ? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. कायदा अस्तित्वात येऊन 12 वर्षे उलटूनही हे प्राधिकरण स्थापन का स्थापन झाले नाही, असा  सवाल करून न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम़ एस़ सोनक यांच्या खंडपीठाने मुंबई व उपनगरांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  तातडीने स्थापन करा, असे निर्देष देऊन याचिकेची सुनावणी 16 फेबु्रवारीपर्यंत तहकूब ठेवली़

राज्याच्या बहुतांश भागांतील शेतकर्‍यांना  दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना  करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधत मराठवाडा अनुशेष निमूर्र्लन आणि विकास मंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे़  या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम़ एस़ सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़  यावेळी खंडपीठाने मुंबई शहर व उपनगरांत इमारत दुर्घटनांचे वाढलेले प्रमाण आणि प्रत्येक पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण आहे. असे असताना 12 वर्षापूर्वी 2005 मध्ये  अंमलात आणलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंलबजावणी होत नसल्याच्या वस्तुस्थितीवरून सरकारवर ताशेरे ओढले़  तसेच मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांमध्ये अद्यापि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात न आल्याने संताप व्यक्त केला.