Mon, Nov 19, 2018 04:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल कायदाची धमकी; मुंबईत हायअ‍ॅलर्ट

अल कायदाची धमकी; मुंबईत हायअ‍ॅलर्ट

Published On: Dec 29 2017 6:49PM | Last Updated: Dec 29 2017 6:49PM

बुकमार्क करा
मुंबई : वृत्तसंस्था

नव्या वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘अल कायदा’ने चित्रफीत प्रसारित करून दिल्ली, बंगळूर, कोलकातासारख्या महानगरात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त असल्याने अन्य शहरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा इशारा ‘अल कायदा’ने दिला आहे.

‘अल कायदा’च्या चित्रफितीनंतर मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. संशयास्पद हालचालीवर पोलिसांची करडी नजर असून घातपाताचा कट उधळून लावण्यास मुंबई पोलिस सज्ज असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियांवरील संशयास्पद संदेशावरही पोलिसांची नजर असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे, विमानतळासह गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात केल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. त्यामुळे तटरक्षक दलानेही सागरी भागातील बंदोबस्त वाढविला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.