होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’

‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’

Published On: Dec 29 2017 5:32PM | Last Updated: Dec 29 2017 5:32PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कमला मिल दुर्घटना मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे घडल्याचे अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले. या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. कमला मिल दुर्घटनेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २१ जण जखमी झाले आहेत. 

‘मुंबईत कमला मिलला लागलेल्या आगित ११ महिला आणि चार पुरुषांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. ते त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहेत. याला शहरातील वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. शहरातील वाढणारी लोकसंख्या वाढतच आहे आणि त्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे’, असे हेमा मालिनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच प्रत्येक शहराची लोकसंख्या किती असावी याच्या मर्यादा ठरवायला हव्यात. त्यापेक्षा जास्त लोकसंख्या होत असेल तर ती दुसऱ्या शहराकडे वळवली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी समाचार घेतला. अनेकांनी हेमा मालिका यांनी थोडे जबाबदारीने बोलायला हवे. त्यांनी वाढत्या लोकसंख्येचा आणि आगीचा संबंध लावण्यापूर्वी त्यांनी आपत्कालिन सोयी सुविधा आहेत का? त्यांचा वापर केला जातो का याची चौकशी करायला हवी, असे म्हटले आहे.

 

खासदार हेमा मालिनी यांना यापूर्वी देखील अशा वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आला होता. सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशात विधवा महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आल्या होत्या.