Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दंडाच्या रकमेतूनच हेल्मेट

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दंडाच्या रकमेतूनच हेल्मेट

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 12:46AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्‍यांचे 500 रुपयांचे चलन फाडण्याबरोबरच त्या रकमेतून संबंधीत दुचाकीस्वारांना हेल्मेट देण्याचा अनोखा फंडा कांदिवली वाहतूक विभागाने अवलंबल्याने तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांच्या या भूमिकेचा दुचाकीस्वारांमध्ये चांगलाच परिणाम दिसून येत आहे.

स्वतःच्या सुरक्षिततेची फिकीर न करता कायदा धाब्यावर बसवून विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे वाहतूक विभागासाठी नेहमीचीच डोकेदुखी बनले आहे. अशा स्वारांना चाप लावण्यासाठी कांदिवली वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिहाना शेख यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍यांचे 500 रुपयांचे चलन फाडण्याबरोबरच त्याच रकमेतून दुचाकीस्वारांना हेल्मेट देण्याचा अनोखा फंडा अवलंबल्याने प्रशासनिक पातळीवर तो चर्चेचा विषय ठरला आहे. या क्‍लुप्तीचा अन्यत्रही वापरता येईल, असा सूर वाहतूक विभागात उमटत आहे. शेख यांच्या अनोख्या भूमिकेने मात्र  दुचाकीस्वारांना चांगलाच धडा मिळत आहे.