Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ONGC चे हेलिकॉप्टर कोसळले; चौघांचा मृत्यू

मुंबई : ONGC चे हेलिकॉप्टर कोसळले; चौघांचा मृत्यू

Published On: Jan 13 2018 2:23PM | Last Updated: Jan 13 2018 5:56PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडच्या (ओएनजीसी) एक हेलिकॉप्टर सकाळपासून बेपत्ता होते. या हेलिकॉप्टमध्ये ५ प्रवासी आणि २ पायलट होते. सकाळपासून बेपत्ता असलेल्या या हेलिकॉप्टरचे काही भाग डहाणूजवळ सापडले. या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. 

पवन हंस या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. त्यात ओएनजीसीचे पाच जण आणि दोघा पायलटचा समावेश आहे. सकाळी साडे दहा वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क झाला होता. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून समुद्रात तीस मैलांवर हेलिकॉप्टरचे शेवटचे लोकेशन सापडले होते. हेलिकॉप्टरचा अपघात नक्की कोणत्या कारणाने झाला. याचा शोध सुरू आहे. 

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच डहाणूमध्येच घडलेल्या शालेय मुलांच्या नौका अपघाताबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.