Sun, Jan 26, 2020 16:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस 

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस 

Published On: Jul 24 2019 8:11AM | Last Updated: Jul 24 2019 10:31AM
मुंबई  : प्रतिनिधी 

तब्बल दोन आठवडे विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईची तुंबून टाकली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे बेस्ट बससह वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा कोलमडून पडली आहे. मध्यरात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अवघ्या 7 तासात कुलाबा 166 मिमी, मलबार हिल 164 मिमी, ग्रॅटरोड 162 मिमी, चंदनवाडी 152, बांद्रा 134 मिमी आदी भागात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग...

1)हिंदमाता सिनेमा व्हाया हिंदमाता उड्डाणपूल 
2) सायन रोड नंबर 24 व्हाया रोड नंबर 3
3) गांधी मार्केट व्हाया उड्डाणपूल भाऊदाजी लाड मार्ग
4) अलंकार टॉकीज ते भेंडी बाजार व्हाया दोन टाकी ते जे. जे. हॉस्पीटल 
5) प्रतिक्षा नगर व्हाया जयशंकर यागनिक मार्ग  
6) गोरेगाव सिध्दार्थ हॉस्पीटल व्हाया गजानन महाराज चौक 
7) एस. व्ही. रोड नॅशनल कॉलेज व्हाया लिंक रोड

 

लालबाग, सायन, मुलूंड, भांडूपमध्ये पावसाची अद्‍यापही रिपरिप सुरूच आहे. पावसाचा आणखी जोर वाढला तर समस्‍येत आणखी भर पडू शकते. दरम्‍यान आज बुधवार आणि उद्‍या गुरूवारीही मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.