Mon, Jul 13, 2020 02:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #CycloneNisarga : नवी मुंबईत जोरदार पावसाचा तडाखा; मोठ्या प्रमाणात पडझड 

#CycloneNisarga : नवी मुंबईत जोरदार पावसाचा तडाखा; मोठ्या प्रमाणात पडझड 

Last Updated: Jun 03 2020 3:36PM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

नवी मुंबईत सकाळपासूनच सोसाट्याचा वारा आणि पावसाला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून महापालिका कार्यक्षेत्रातील आठ विभागात 22 झाडे कोसळली. अग्निशमन दलाच्या मदतीने ती बाजूला करून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

वाशी, बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, तुर्भे आणि ऐरोलीत 12 वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. उरण मध्ये झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून अनेक घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. सीबीडी सेक्टर मार्केट मधील झाड बुंद्यासकट उमळून पडले. मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सारसोळे, वाशी, दिवाळे, मोरा, उरण आणि वाशी खाडी किनारपट्टीवर सागरी सुरक्षा पोलिस तैनात करण्यात आले आहेत.