Fri, Nov 16, 2018 18:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी

पवारांच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी

दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्याचे वक्‍तव्य करणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर उद्या शुक्रवारी दोन वर्षानंतर उच्च न्यायालयात सुनावणी  होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती  रणजीत मोरे आणि अनुजर प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. 

लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान शरद पवार यांनी  माथाडी कामगारांच्या मेळाव्यात निवडणूका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा असे वक्तव्य केले होते.