Mon, Jul 06, 2020 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोईसर पूर्व भागात घातक रासायनिकांची बॅरल

बोईसर पूर्व भागात घातक रासायनिकांची बॅरल

Published On: Jul 19 2018 8:23AM | Last Updated: Jul 19 2018 8:23AMठाणे : प्रतिनिधी

बोईसर पूर्व भागातील रावते पाडा, खैरापाडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील टीन्स वर्ल्ड या शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर  काही अज्ञातांनी घातक रासायनिक पदार्थांनी भरलेले ११ बॅरल रस्‍त्यावर टाकले आहेत.  

सकाळी शाळेत आलेले शिक्षक व मुलांना याचा त्रास होवू लागल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक राजेश निनावे यांनी त्वरित बोईसर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिसांनीही त्वरित हालचाल करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर व अग्निशमन दल तारापूर यांच्या सहाय्याने उपाययोजना केली. त्यामुळे पुढील संकट टळले. परंतु या घातक रासायनिक पदार्थाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यामुळे आसपासचा परिसर बंद करावा लागला.