होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकीशी ठेवले शारीरिक संबंध केला दुसर्‍याशी विवाह

शारीरिक संबंध एकीशी आणि विवाह दुसरीशी

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:42AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

चेंबूरमध्ये राहात असलेल्या 29 वर्षीय तरुणीला विवाहाचे आमिष दाखवत एका तरुणाने तिच्यावर तब्बल सहा वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाने दुसर्‍या मुलीसोबत विवाह केल्याचे उघड झाल्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत विक्रोळी पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 

चेंबूर परिसरात कुटूंबासोबत राहात असलेली 29 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. ओळखीतून 2008 साली तिचे जावेद अख्तर शेख (28) या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. शेख याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत विक्रोळीच्या टागोरनगरातील चाळीत, बदलापुरातील त्याच्या मालकीच्या फ्लॅटवर आणि टिटवाळ्यातील लॉजवर नेत 2014 सालपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शेखने तिच्यासोबत सर्पंक तोडला. शेखने अन्य एका तरुणीसोबत विवाह केल्याचे या तरुणीला समजताच तिने 21 तारखेला विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून बलात्काराच्या भादंवी कलम 376 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी शेख याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.