Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३१ पासून हार्बरच्या फेर्‍या वाढणार

३१ पासून हार्बरच्या फेर्‍या वाढणार

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 31 जानेवारीपासून या नवीन सेवा सुरु होणार असून त्यांची संख्या साधारणपणे 26 इतकी आहे.

दिवसेंदिवस हार्बर मार्गावरील लोकलवर बर्‍याच प्रमाणात ताण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना बराच मनस्तापही सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील लोकल फेर्‍या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून हार्बर मार्गावर 10, तर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल 16 नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील दहा सेवा वाढल्याने दर दिवसांच्या फेर्‍यांची संख्या 604 वरून 614 होणार आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांची संख्या 246 वरून 262 वर पोहोचणार आहे. या सेवा सुरू झाल्यावर हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही बदल होणार असून अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.  

वाढ करण्यात आलेल्या लोकल सेवांचे विवरण खालीलप्रमाणे

उपनगरीय लोकल     प्रस्थान         आगमन

डाऊन हार्बर मार्गावरील सेवा

वडाळा रोड-पनवेल    वडाळा रोड 07.39 वा.    पनवेल 08.41 वा.
वडाळा रोड-पनवेल    वडाळा रोड 10.40 वा.    पनवेल 11.42 वा.
वडाळा रोड-वाशी    वडाळा रोड 12.39 वा.    वाशी  13.10 वा.
वडाला रोड-वाशी    वडाळा रोड 14.34 वा.    वाशी  15.05 वा.
वडाला रोड-पनवेल    वडाळा रोड 17.01 वा.    पनवेल 18.03 वा.

अप हार्बर मार्गावरील सेवा

वाशी-वडाळा रोड    वाशी  06.47 वा.    वडाळा रोड 07.18 वा.

पनवेल-वडाळा रोड       पनवेल 09.16 वा.    वडाळा रोड 10.18 वा.
पनवेल-वडाळा रोड     पनवेल 11.28 वा.    वडाळा रोड 12.29 वा.
वाशी-वडाळा रोड     वाशी  13.34 वा.    वडाळा रोड 14.06 वा.
वाशी-वडाळा रोड     वाशी  16.06 वा.    वडाळा रोड 16.38 वा.

डाऊन ट्रान्स हार्बर सेवा

ठाणे-पनवेल     ठाणे 09.14 वा.    पनवेल 10.06 वा.
ठाणे-नेरूळ     ठाणे 15.05 वा.    नेरूळ  15.35 वा.
ठाणे-वाशी     ठाणे 15.52 वा.    वाशी  16.23 वा.
ठाणे-वाशी    ठाणे 16.19 वा.    वाशी  16.48 वा.

ठाणे-नेरूळ     ठाणे 17.16 वा.    नेरूल  17.46 वा.
ठाणे-पनवेल     ठाणे 18.10 वा.    पनवेल 19.01 वा.
ठाणे-नेरूल    ठाणे 20.20 वा.    नेरूळ 20.50 वा.
ठाणे-पनवेल     ठाणे 21.36 वा.    पनवेल 22.28 वा.

अप ट्रान्स हार्बर सेवा

पनवेल-ठाणे     पनवेल 08.15 वा.    ठाणे 09.08 वा.
पनवेल-ठाणे    पनवेल 10.15 वा.    ठाणे 11.05 वा.
वाशी-ठाणे    वाशी  15.11 वा.    ठाणे 15.40 वा.
नेरूळ-ठाणे     नेरूळ 15.45 वा.    ठाणे 16.15 वा.

वाशी-ठाणे    वाशी  16.31 वा.    ठाणे 17.00 वा.
नेरूळ-ठाणे    नेरूळ 17.54 वा.    ठाणे 18.24 वा.
पनवेल-ठाणे     पनवेल 19.18 वा.    ठाणे 20.11 वा.
नेरूळ-ठाणे    नेरूळ  20.58 वा.    ठाणे 21.28 वा.