Sat, Jan 19, 2019 01:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर रेल्वे उशिराने, प्रवासी वैतागले

हार्बर रेल्वे उशिराने, प्रवासी वैतागले

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काही काळासाठी विस्कळीत झाली. चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळीच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असूनही हार्बर मार्गावरील गाड्या मात्र 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

नववर्षाच्या स्वागतानंतर  कामासाठी कार्यालयांकडे निघालेल्या प्रवाशांना हार्बर मार्गावरील गोंधळाचा फटका बसला. चेंबूर येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी पावणे सातच्या सुमारास चेंबूर येथे सिग्नलमध्ये बिघाड झाली. त्यामुळे वाशीवरून छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेलकडे जाणार्‍या लोकलचा खोळंबा झाला. 

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचं रडगाणं सुरू झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Tags : Harbor Railway, traffic, disrupted, mumbai news