Fri, Nov 16, 2018 06:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हापूसची पहिली पेटी गेली ९ हजाराला

हापूसची पहिली पेटी गेली ९ हजाराला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

फळांचा राजा म्हणून ओळख असलेला देवगडचा हापूस आंबा यावर्षी नोव्हेंबरमध्येच मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात दाखल झाला. वर्षाच्या हंगामातील कोकणातील हापूसची पहिली पाच डझनची पेटी 9 हजारांना विकली गेली. 

देवगडमधील प्रकाश शिरसेकर या शेतकर्‍याने ही पहिली पेटी बाजारात पाठवली होती. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी दरम्यान हापूसची पहिली पेटी बाजारात येत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्येच हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. पाच डझनच्या पेटीला नऊ हजार रुपये दर मिळाला आहे. पहिली पेटी नोव्हेंबरमध्ये दाखल झाल्याने शेतकरी तसेच व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी ही पेटी विकली गेल्यानंतर व्यापार्‍यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. वाशी फळ बाजारात प्रशांत राणे या घाऊक व्यापार्‍याकडे ही आंब्याची पेटी आली होती. आंब्याच्या पहिल्या पेटीचा दर सांगण्यास व्यापारी टाळत आहेत. त्यामुळे बाजारातील दर कोसळतात, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र पेटी नऊ हजार रुपयांना विकली गेल्याची चर्चा बाजारात आहे.