Tue, Jul 16, 2019 22:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कट ऑफ वाढणार

कट ऑफ वाढणार

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल राज्यातील इतर मंडळाच्या तुलनेत जरी पिछाडीवर असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीला उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7 हजारांनी वाढली आहे. त्याचबरोबर 90 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मुंबईत 2 हजारहून अधिक आहे. नव्वदी पार केलेल्या या विद्यार्थ्यांच्यामुळे मुंबईतील नामवंत महाविद्यालयात यंदा एफवाय ला प्रवेश घेताना काँटे की टक्‍कर निश्‍चित आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखांचा भाव वधारणार असून कटऑफमध्येही उच्चांकी वाढ होण्याची शक्यताही प्राचार्यांनी वर्तवली आहे.

मुंबई विभागात तब्बल 300हून अधिक महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 1.09 टक्क्यांनी घसरला असला मुंबईत टॉपर्स संख्या कमी नाही. त्याचबरोबर 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही 38 हजारांच्या घरात आहे. त्याचबरोबर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही छप्पर फाड के  टक्केवारी मिळाल्याने यंदा एफवाय प्रवेशात मोठी चुरस अपेक्षित आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात 2 लाख 90 हजार जागा असल्याचे विद्यापीठाने म्हटले असले तरी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कोकण आणि मुंबई विभागीय मंडळातील उतीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 3 लाखाहून अधिक आहेत.  

मुंबई मंडळात एकूण 2 लाख 79 हजार 790 विद्यार्थी (पुनर्परीक्षार्थी मिळून) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातून 31 हजार 529 विद्यार्थी आहेत. दोन्ही मंडळाचे 3 लाख 11 हजार विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. याशिवाय सीबीएसई आणि आयसीएसई या मंडळांचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही आहेत.  40 हजार विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. यामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचा तीन ते चार टक्यांनी कटऑफ वाढेल अशी शक्यता प्राचार्यांनी व्यक्‍त केली आहे. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील उतीर्ण विद्यार्थी संख्या आणि आता सद्यस्थितीत उपलब्ध जागा याची तुलना केल्यास प्रवेशाचे गणित चुकण्याची शक्यता आहे.