Sat, Nov 17, 2018 11:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावी पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार कायम

बारावी पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार कायम

Published On: Mar 01 2018 1:52AM | Last Updated: Mar 01 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने त्यांच्या काही मागण्यांसाठी 12 वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. सदर संघटनेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करुन, या संघटनेच्या काही  मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधीमंडळात एका निवेदनाच्या मार्फत दिली. मात्र हा बहिष्कार मागे घेण्यास महासंघाने नकार दिला आहे.

शालार्थ प्रणालीमध्ये नावांचा समावेशासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांची 42 दिवसांची संपकालीन रजा अर्जित रजा म्हणून मंजुर करण्यात आली आहे. तसेच एम. फील व पीएचडीधारक कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांना विविध चर्चासत्रामध्ये संशोधन अहवाल वाचण्यासाठी/उपस्थितीसाठी कार्यरजा मंजूर करण्यात येणार आहे. वेतनवाढीसाठी काही अटी 23 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार पुर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्यात येणार नाही, शिक्षक संघटनेने उत्तरपत्रिका तपासणीवर घोषित केलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन तावडे यांनी केले.