Fri, May 24, 2019 07:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुटखाबंदीचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे सक्तमजुरी

गुटखाबंदीचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे सक्तमजुरी

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

गुटखा बंदीचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि या संदर्भातील गुन्हे अजामीनपात्र करण्याची तरतूद नव्याने कायद्यात करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी विधान परिषदेत केली.

राज्यात गुटखा बंदी असतानाही खुलेआम त्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. वारंवार एकाच भागात जर अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. 

पाच वर्षांत 114 कोटींचा गुटखा जप्त

गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू आदी पदार्थांच्या विक्रीवर राज्यात 2012 पासून बंदी घालण्यात आली आहे. तरीही गेल्या पाच वर्षांत जवळपास 114 कोटी 20 लाख रुपये किमतीचा गुटखा बंद करण्यात आला. 3354 खटले न्यायालयात दाखल असून 3719 व्यक्तींच्या विरोधात एफ.आय.आर. दाखल करण्यात आले आहेत. 6054 पेढ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.