Fri, Nov 16, 2018 19:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजरातचे जनमत चाचण्यांचे अंदाज पटले नाहीत : उद्धव ठाकरे

गुजरातचे जनमत चाचण्यांचे अंदाज पटले नाहीत : उद्धव ठाकरे

Published On: Dec 16 2017 4:29PM | Last Updated: Dec 16 2017 4:29PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जनमत चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, जनमत चाचण्यांचे अंदाज फारसे पटले नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जो निकाल लागायचा तो लागेलच आणि तो सोमवारी कळेलच, तो आपल्याला  मान्यही करावा लागेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ९ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई असलेल्या भाजप आणि काँग्रेसने गुजरात निवडणुकीत विजय मिळेल, असा दावा केला आहे. मात्र, मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं मत प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारल असता त्यांनी यावर भाष्य केलं आहे 

ठाकरे म्हणाले, 'गुजरात निवडणूक निकालांबाबत जनमत चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आलेले अंदाज फारसे पटलेले नाहीत. गुजरातमधील वातावरण आणि जनमत चाचण्यांचे अंदाज यामध्ये खूपच फरक आहे.' काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचही उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि आणि शुभेच्छाही दिल्या. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी चांगली मेहनत घेतली असेही ठाकरे म्हणाले. पक्षातील कार्यकर्त्यांच्या राहुल गांधी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतात का ते आता पाहायचं, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींसमोर बोलताना व्यक्त केली.