Thu, May 23, 2019 15:05
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही संघर्ष करणार

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही संघर्ष करणार

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:49AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्याक जनतेला वेठीस धरले जात आहे, असा आरोप करत जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल यांनी मिळून दिलेल्या आव्हानामुळे गुजरातमध्ये भाजपची पीछेहाट झाल्याचे गुजरातचे आ. अल्पेश ठाकूर यांनी सांगितले.

मुंब्रा येथे झालेल्या मुशायराला सोमवारी आ. ठाकूर यांनी भेट देऊन हजारो रसिकांशी दिलखुलास संवाद साधला. तसेच गुजरातमधील राजकारणावर भाष्य केले. महाराष्ट्रात आ. जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्षे पुरोगामी लढा लढत आहेत. त्यांना साथ देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. आव्हाड यांच्यासारख्या तरुण आमदाराने संविधान आणि संसदीय लोकशाहीसाठी उभारलेला लढा बघूनच आम्ही मैदानात उतरलो आहोत. आता त्यांच्या साथीने महाराष्ट्रातही हा लढा आम्ही उभारणार आहोत. हार्दिक पटेल, मी आणि आ. आव्हाड राज्यात संघर्ष उभारू, असे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी आ. आव्हाड, नगरसेवक शानू पठाण, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान, राजन किणे आदी उपस्थित होते.