Mon, Apr 22, 2019 05:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील भूमिपूजन कार्यक्रमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब

ठाण्यातील भूमिपूजन कार्यक्रमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब

Published On: May 21 2018 10:07AM | Last Updated: May 21 2018 10:07AMठाणे: खास प्रतिनिधी

ठाणे आणि नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्था मजबूत आणि वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी आज एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येणाऱ्या कोपरी पूल, ठाणे- बेलापूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग चारला जोडणारा उन्नत रस्ता, भुयार आणि घणसोली-तळवली उड्डाणपूल महापे उड्डाणपूल आदींचे  भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमधून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक मंत्री) एकनाथ शिंदे यांचा फोटोच गायब झाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मग त्यांचा जाहिरातींमधून फोटो का गायब झाला आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

श्रेयाच्या  राजकारणातून हा प्रकार घडला असावा, अशी ही चर्चा सुरू झाली असून शिवसैनिक नाराज झाल्याचे चित्र आहे.