Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी आजपासून 

पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी आजपासून 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या अधिसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 11 वाजता फोर्ट संकुलातील दीक्षांत समारंभ सभागृहात सुरू होणार आहे. सहा गटांत 25 हजारांवर मतदान झाल्याने सुमारे दीड लाख मतपत्रिकांची मोजणी करावी लागणार आहे. याकामी 50 तास लागतील असा अंदाज असून पहिला निकाल बुधवारी पहाटेपर्यंत समजणार आहे. 

मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक विद्यापीठ कायद्यामुळे रेंगाळली होती. तब्बल सात वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. रविवारी तब्बल 40 टक्के मतदान झाले आहे. खुला प्रवर्ग - 5, ओबीसी - 1, महिला प्रवर्ग - 1, अनुसूचित जाती - 1, अनुसूचित जमाती - 1 आणि  विज-भजसाठी 1 अशा 10 जागांसाठी सहा गटांतूून मतदान झालेल्या   मतपत्रिका आधी वेगळ्या केल्या जाणार आहेत. यावेळी तर 25 हजारांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतपत्रिकांचा आकडा दीड लाखांपर्यंत गेला आहे. त्यामुळे 50 ते 55 तास या प्रक्रियेसाठी लागण्याची शक्यता आहे. मतपत्रिकांच्या विभागणीसाठी मंगळवारचा संपूर्ण दिवस जाण्याची शक्यता आहे. आणि प्रत्यक्ष मतमोजणी रात्री उशिरा सुरू होईल असा अंदाज निवडणूक विभागाचा आहे. या निवडणूकीत युवासेना आणि अभाविप यांच्यात मोठी चुरस झाली आहे.

Tags : mumbai news, Graduate Election,  Counting, vote, today,


  •