Fri, Nov 16, 2018 18:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मातृभाषा मृत्युभाषा बनू नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करा : राज्यपाल

मातृभाषा मृत्युभाषा बनू नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करा : राज्यपाल

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

मातृभाषा मृत्यूभाषा बनू नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन मंगळवारी साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला  राज्यपालांनी मराठी लेखक, कवी आणि प्रकाशकांची अनौपचारिक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा, शिक्षण तसे क्रीडा मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले, मराठी ही सर्वात जुन्या आणि समृद्ध भाषांपैकी एक भाषा आहे. मराठीच्या 60 बोलीभाषा आहेत. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांनी मराठी भाषा आणि संस्कृतीला आकार दिलाआहे. मातृभाषेत शिक्षण घेणार्‍या मुलांना विषयाचे आकलन अधिक चांगले आणि वेगाने होते, हे विज्ञानाने सिद्ध केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात जागतिक मराठी परिषद आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी केले. 

मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया वाड, डॉ. महेश केळुसकर, किशोर कदम, दिलीप करंबेळकर, रामदास भटकळ, मोनिका गजेंद्रकडकर, चांगदेव काळे, बाबा भांड, प्रेमानंद गज्वी, डॉ. शिरीष देशपांडे, अरुणा ढेरे आणि इतर यावेळी उपस्थित होते.